measurementपूर्वी द्रवरुपातील वस्तू--दूध, तेल, केरोसीन इ. मापाने मिळत. त्या मापाना एक हॅंडलही असे.शेर,अर्धा शेर, पावशेर अशी मापे असत. केरोसीन, पेट्रोल गॅलनवर मिले.एक गॅलन म्हणजे साधारण ४.५ लिटर. अमेरिकन गॅलन मात्र ४लिटर (की ३.५ली?).

 एक चतुरथांश गॅलन म्हणजे १क्वार्ट. क्वॉर्टचा अर्धा भाग म्हणजे पाइंट. बीयर पाइंटमधे मिळे.(असं म्हणतात! तेव्हां आम्हाला बीअर, दारू म्हणजे काहीतरी भयंकर पेय असंच वाटे). अजूनही बीअर पाईंटमधेच मिळते. १९५७ साली मेट्रिक सिस्टिम आल्यावर मात्र लिटर नि मिलिलिटर ही मापे चालू झाली. आपल्याला अभिमान वाटावा ही गोष्ट अशी की मेट्रिक सिस्टिम ही सोयीस्कर पद्धत स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण एका दशकांतच स्वीकारली. इंग्लंड अमेरिकासारख्या प्रगत राष्ट्रात मात्र एक चलनी नाणी वगळता जुनी किचकट पद्धत चालूच आहे. 

Read more...

अजू देशपांडे..

        मध्यंतरी अखिलभाई, राकेशभाई व करकोचा बेन यांच्यात एक मिटींग झाली व दोघा भावातील भांडणाचे रुपांतर एका समेटात झाले. त्या संभाषणाची फीत एका चॅनेलनेदिवसातून दोनशे पंचावन्न वेळा ( तीनशे पंचावन्न कमर्शियल ब्रेक घेत) दाखवली. मी भारतातल्या अनेक रिकामटेकड्यांपैकी एक असल्यामुळे मला पूर्ण दिवस बघता आली व पाठदेखील झाली. (अशा किती संस्कृतच्या व्याकरणाच्या दाखविल्या असत्या तर मला संस्कृत या विषयात ग्रेस मार्काची गरज कधीच लागली नसती.)

Read more...

devanand

-          अजू देशपांडे.

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास माझ्या एका संपादक मित्राचा फोन आला. “तुझा फिल्म जगतात कुणाशी काँटॅक्ट् आहे का रे?”.“नाही रे बाबा मी पडलो बीएमसीमध्ये काम करणारा (कधीकधीच) एक सामान्य कर्मचारी. बर, काय खास काम?” मी आश्र्चर्यचकित होऊन विचारले.

Read more...

काही गोष्टी अशा असतात की त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रे, मासिके वैगरे मध्ये सतत लिखाणपट्टी होत असते. उदा: आमचा सचिन, लता दीदी (आशावाद्यानो माफ करा) किंवा आपले जुने पु.ल.(मॉर्डन पुलना प्लाय ओव्हर असे म्हणतात.) आताशा बिन (धास्त) लादेन. त्यामुळे ह्या महान व्यक्ती कुठे आहेत? काय करतात ? आज किती वेळा शिंकले ? वैगरे माहितीचे खाद्य प्रसारमाध्यमे आपल्याला पुरवत असतातच.

Read more...

    Name:
    Email: