लेखक (अजू देशपांडे) मुंबईतून प्रकाशित होणा-या ‘मिड डे’ व नंतर ‘आफ्टरनून’ मधील बिझीबिच्या (बेहराम कॉन्टॅक्टर ) ‘राउंड अॅन्ड अबाऊट’सदरचे दिवाने होते. बिझीबी तसा कुठल्याही विषयांवर गुदगुदल्या कर चिमटे काढत मनातले लिहायचा. त्याची शैली ‘अजू’ ला आवडायची. अशा प्रकारचे लेखन करायची लेखकाची इच्छा होती व ती ‘आम्ही पार्लेकर’ मधील सदराद्वारे पूर्ण झाली. ह्या सदरातून विविध विषयांवरील विचार वाचकांपर्यंत हसत खेळत पोहचवण्याचा लेखकाने प्रयत्न केला. गेल्या पंधरा वर्षातील काही निवडक लेख एकत्रित करून पुस्तकरुपात प्रसिद्ध करावेत व ह्या लेखांबरोबर गमतीदार चित्रे (कॅरिकेच/ इलस्ट्रेसंस्) छापल्यास लेखांना अधिक उठाव येईल ह्या विचाराने सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. श्रीनिवास प्रभूदेसाईना सुसंगत व्यंगचित्रे काढण्याची विनंती केली. त्यांनीदेखील ज्ञान ओतून, साजेशी चित्रे काढून लेखांची रंगत वाढवण्याचे काम केले आहे. प्रभूदेसाईंची व्यंगचित्रे ‘सामना’, ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती’ इत्यादी लोकप्रिय वर्तमानपत्रातून वारंवार प्रसिद्ध होत असतात. जवळ जवळ तीस चित्रे त्यांनी (त्यांच्या ह्या व्यग्र दिनचर्येतूनदेखील) कमीतकमी वेळात आश्चर्यकारकरित्या रेखांकित केली. ह्या पुस्तकाच्या वाचकांनी ह्या पुस्तकाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा हि सदिच्छा. वाचा आणि आवडले तर मित्र-मैत्रिणींना ‘लिंक’ फॉरवर्ड करा. हॅपी‘इ’ रिडींग. |