अजू देशपांडे ह्याचं पाहिलं पुस्तक ‘हाफ कट हाफ ड्राइव्ह’ ऑक्टोंबर २००५ मध्ये प्रकाशित झालं. ते बहुधा तुम्ही वाचलं असेल. ह्या पहिल्या पुस्तका निमित्त एक नविन शैलीतला नवा लेखक तुमच्या समोर आला, आणि त्याच स्वागत तुम्ही खुपच उस्फूर्त आणि हस-या प्रतिक्रियांनी केलं. या ‘हटके’ लेखन शैलीचा तुम्हाला स्वाद देण्याची रिस्क लेखक दुस-यांदा घेत आहे. हा ‘बुफे’तुमच्यासमोर ठेवण्यात त्याला खूप आनंद होत आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं वाचा. आवडणारा पदार्थ भरपूर खा, ताव मारा, नो लिमिट, नो एक्स्ट्रा चार्ज. ‘ह्या पुस्तकाची थिम काय ?’ अस तुम्ही विचाराल, ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ‘अंकलचे अनुभव.’ अंकल जो तुमच्या आमच्यात दडलेला आहे. अंकल म्हणजे ‘पांढरकेशा’ माणूस ? नव्हे ! ‘अंकल म्हणजे जो सगळ काही उघड्या डोळ्यांनी पाहतो, सगळ काही सोसतो आणि आणि निभावून घेतो.’ कॉलेजमधून नुकताच बाहेर पडलेला युवक हा आपल्याला कुणी ‘अंकल’ म्हणू नये म्हणून धडपडत असतो. पण खरं तर ‘अंकल’ म्हणजे एक ‘मॅच्युर्ड’(परिपक्व) व्यक्ती. तर ह्या पुस्तकात तुम्हाला ह्याच अंकलच्या खोपडीतली मुक्ताफळे वाचावयास मिळतील. खात्री आहे “यु विल एन्जॉय”. ह्या ‘जीवनसत्वयुक्त’ भोजनाला अतिशय नाविन्यपूर्णरितीने उठावदार आणि स्वादिष्ट बनवण्याचे महत्वपूर्ण काम जातिवंत कलाकार श्री अनिश दाते ह्यांनी उत्तमरित्या पार पडले आहे. |