h

हास्याच्या गुलालात,
सुखदुखःच्या सानिध्यात,
मानवाला आश्रय देतं,
असं ते घर.

 

भावाची दादागिरी,
बहिण माहेरघरी,
आई-वडिल करारी,
असती कोठे ?

अंगणात वृन्दावन,
पलीकडे ती विहीर,
स्वतंत्र देवघर,
असते कोठे ?

नारळ - सुपारी,
आंबा परसदारी,
फणस वेशीवरी,
असतो कोठे ?

स्वयंपाकाची ती चूल,
तेवतसे सालोंसाल,
पाहुण्यांची वर्दळ,
असते कोठे ?

गाईचं वासरु,
कुत्राच पिल्लु,
पोपट विठू विठू,
असतो कोठे ?

गाव असो व शहर,
सासर अथवा माहेरघर,
एक स्वरूप आकार,
असतो कोठे ?

वैरभाव नसे जेथे,
विषमता मान्य नसे,
लक्ष्मी ही तेथेच,
नांदतसे…।            

DHIRAJ PHADKE

9029481548


    Name:
    Email: