साधेपणा तली श्रीमंती बघायची आहे? माझ्यासोबत या
माझ्या मित्रांबरोबर एक पेग नम्रतेचा प्या

पहिल्या प्रथम एका कुबेराबद्दल बोलतो
लहान पणा पासून तो पैशांत लोळतो
परी प्रसिद्धी पासून नेहमीच दूर पळतो
दाखवत फिरत नाही परदेशी गाडया नव्या
तयाच्या साधेपणा तली श्रीमंती बघायची आहे? माझ्यासोबत या
माझ्या या सज्जन धनवाना सोबत एक पेग नम्रतेचा प्या

Read more...

आज आवडली माझी स्टाइल माझिच मला
आज आवडलो मीच मला

आरशासमोर उभा राहुन आज निरखले मीच मला ।
माझे विस्कटले होते केस जरा
केसांचा रंग थोड़ा पांढरा, थोड़ा काळा
तरीपण आज आवडली स्टाइल माझिच मला
आज आवडलो मीच मला ।

Read more...

आमच्या अंगणात होते एक डौलदार बदामाचे झाड

 आजूबाजूला आता झाले टॉवर ताडमाड |

Read more...

आमचे रस्ते किती छान आमचे रस्ते महान
अचानक वरुन पड़ते झाड़ आणि ओढवते मरण
खाली उघड़े गटारा चे झाकण
काय माहित जीवन किती वर्ष
का फक्त काही क्षण

सिग्नल कधी चालतात कधी नाही
मरणाची घाई सर्वाना
लाल दिवा तोड़ता तुम्ही, तोड़तो मी पण
काय माहित जीवन किती वर्ष,
का फक्त काही क्षण

खड्डे खतरनाक रस्ते ओबडधोबड़
फुटपाथ फेरिवाल्यां ना आन्दण
काय माहित जीवन किती वर्ष
का फक्त काही क्षण

बाइक वाले अंगावर,
पोलिसांना अनावर
ह्यांना रस्ते म्हणजे मोकळे आंगण
काय माहित जीवन किती वर्ष
का फक्त काही क्षण


कधी मध्येच येतात गुरे
त्याने वाचवण्यास गाडीचे ब्रेक्स अपुरे
वाहन चालकाचे धाबे दनादण
काय माहित जीवन किती वर्ष
का फक्त काही क्षण


रात्रि चवताळलेले कुत्रे अंगावर जोमाने
त्यांना पोस्ती दयावान प्रेमाने
जीव वाचवायाासाठी छत्तीस कोटि देवांचेदेखिल अपूरे पड़ते स्मरण
काय माहित जीवन किती वर्ष
का फक्त काही क्षण

धुर कधी काळा कधी पांढरा फुफुसात दाटी
जणू ओढल्या पन्नास विना फिल्टर सिगरेटी
गाड्यांचे हॉर्न कानाच्या पड़दयांची करतात चाळण
ऐसैच अमुचे सरल जीवन माहित नाही
कधी येईल मृत्युचे वळण
काय माहित किती वर्ष जगतोय
का फक्त काही क्षण

एक आजपर्यंत वाचलेला - अजु देशपांडे

    Name:
    Email: